ना बोलणार मी काही, ना बोलणार तू काही.
पण अंतर तुझ्या-माझ्यातलं, शांत राहणार नाही!
ना बघणार मी कधी, ना बघणार तू कधी.
पण नजरेचा काय भरोसा, की ती पाहणार नाही!
अंतर तुझ्या-माझ्यातलं, शांत राहणार नाही!
ना मी लिहिणार काही, ना तू वाचणार काही.
शब्द माझे तुझ्याकडे, मी आणणार नाही!

नसणार मी आता, तुझ्या जागण्याचं कारण.
जागेल मन माझं, मी जागणार नाही!

ना मी मागणार काही, ना तू देणार काही.
तुला देतोय प्रत्येक श्वास माझा, मी सांगणार नाही!

No comments:
Post a Comment