कुठे माझ्या
प्रियेला, कळतात शब्द माझे.
म्हणूनच दूर तिच्यापासून,
पळतात शब्द माझे.
पचवले कित्येक उन्हाळे,
तिच्या विरहाचे.
भर पावसात आता,
जळतात शब्द माझे.
ओठांपर्यंत येऊन,
पुन्हा मागे फिरतात.
गिरणीत मनाच्या,
दळतात शब्द माझे.
कधी वाटतो,
हा अबोलाच बरा बरासा.
उगाच मला मग,
छळतात शब्द माझे.
कुठे प्रिये तुला, कळतात शब्द
माझे?/
मग का तुझ्याच वाटेकडे, वळतात
शब्द माझे?
सांग ना...!
No comments:
Post a Comment