ओठांवर राग तुझ्या, डोळ्यांत द्वेष खोटा,
मनात प्रेम तुझ्या, मी वाचून आहे!
नाना बहाणे,नकाराचे तुझ्या,
होकार त्यातला, मी जाणून आहे...
मनात प्रेम तुझ्या, मी वाचून आहे!
न वाचलेली ती कविता, तू जाळली का नाहीस?
नसेल माहीत तुला, मी ओळखून आहे...
मनात प्रेम तुझ्या, मी वाचून आहे!
बघून डोळ्यांत माझ्या, दे उत्तरं सारी.
का झुकते नजर तेव्हा, मी पारखून आहे...
मनात प्रेम तुझ्या, मी वाचून आहे!
ऐक माझं जरा, हारशील तू प्रिये,
खेळ हे सारे, मी खेळून आहे!!
मनात प्रेम तुझ्या,
मी वाचून आहे!
मनात प्रेम तुझ्या, मी वाचून आहे!
नाना बहाणे,नकाराचे तुझ्या,
होकार त्यातला, मी जाणून आहे...
मनात प्रेम तुझ्या, मी वाचून आहे!
न वाचलेली ती कविता, तू जाळली का नाहीस?
नसेल माहीत तुला, मी ओळखून आहे...
मनात प्रेम तुझ्या, मी वाचून आहे!
बघून डोळ्यांत माझ्या, दे उत्तरं सारी.
का झुकते नजर तेव्हा, मी पारखून आहे...
मनात प्रेम तुझ्या, मी वाचून आहे!
ऐक माझं जरा, हारशील तू प्रिये,
खेळ हे सारे, मी खेळून आहे!!
मनात प्रेम तुझ्या,
मी वाचून आहे!
No comments:
Post a Comment