घेऊन जा तुझे हे देणे नक्षत्रांचे,
ग्रहणाशी अशी ही, चेष्टा बरी नाही.
पाहून तुझ्याकडे, शब्द बे-लगाम सुटले.
सोड.विसर.ती कविता खरी नाही.
ग्रहणाशी अशी ही, चेष्टा बरी नाही.
मी लेखक, मी कवी, मी प्रेमी, मी बरंच काही.
तुला सोन्या चांदीनी मढवण्या इतका...
मी हरहुन्नरी नाही.
ग्रहणाशी अशी ही, चेष्टा बरी नाही.
कळते माझी जागा, तुझ्या माझ्यातलं अंतर.
समजतं सगळं मला, तू बोललीस जरी नाही.
ग्रहणाशी अशी ही, चेष्टा बरी नाही.
शब्द संपले माझे, डोळेही मुके झाले.
तूच बोल ना, आता तरी काही!
ग्रहणाशी अशी ही, चेष्टा बरी नाही.
ग्रहणाशी अशी ही, चेष्टा बरी नाही.
पाहून तुझ्याकडे, शब्द बे-लगाम सुटले.
सोड.विसर.ती कविता खरी नाही.
ग्रहणाशी अशी ही, चेष्टा बरी नाही.
मी लेखक, मी कवी, मी प्रेमी, मी बरंच काही.
तुला सोन्या चांदीनी मढवण्या इतका...
मी हरहुन्नरी नाही.
ग्रहणाशी अशी ही, चेष्टा बरी नाही.
कळते माझी जागा, तुझ्या माझ्यातलं अंतर.
समजतं सगळं मला, तू बोललीस जरी नाही.
ग्रहणाशी अशी ही, चेष्टा बरी नाही.
शब्द संपले माझे, डोळेही मुके झाले.
तूच बोल ना, आता तरी काही!
ग्रहणाशी अशी ही, चेष्टा बरी नाही.
No comments:
Post a Comment