आता सांगू मी तरी, कुणास
किती.
आहेत तरी लोक माझ्या,
आस-पास किती?
माझ्याच झाडाने, पळविली
सावली माझी.
दोष मी तरी देऊ, उन्हास
किती.
वेदना सुसह्य झाल्या, जगणे
असह्य झाले.
खोटाच ताव मारू, मिशास
किती.
मृत्युनेही तेव्हा, आमंत्रण
नाकारले माझे.
उसने उगाच घेऊ, श्वास किती.
चीतेभोवती माझ्या,
उदबत्त्या पेटल्या जरी,
अजूनही तुझा इथे, सुवास
किती.
चोरून आग माझीच, पेटली चिता
जरी ही,
बघ त्या काळ्या
धुराची...मिजास किती!
No comments:
Post a Comment