आपल्या प्रणयाची खोली, मी
का आवरावी?
ती विस्कटलेली चादर मी,
तशीच पांघरावी.
राहुदे तशीच जरा, माझ्या
कुशीतली उशी तुझी.
आठवण तुझी पुन्हा मी, मिठीत आवळावी.
वेडा चंद्र बघ तो,
खिडकीतुनी डोकावतो.
ईर्ष्या माझी त्याने, किती
करावी!
मी पुन्हा धुंद होऊन, बेफाम
सुटावे.
ती लाजरी नजर तुझी, पुन्हा
बावरावी.
सरावी अशी आता, प्रत्येक
रात्र प्रिये,
चांदणी प्रत्येक आपुल्या,
प्रेमात नहावी!
No comments:
Post a Comment