तेव्हा माझ्या जीवाला,
लाभला दिलासा,
केलास तू मिठीत माझ्या,
प्रेमाचा खुलासा.
तू ही तेव्हा, थोडी शहारली
होतीस,
केला मी स्पर्श जेव्हा,
ओठांनी जरासा.
केसात तुझ्या, ओल्या मातीचा
गंध होता,
मी ही मग थोडा, बरसलो
नभासा.
चुम्बले मी तुझे, क्षण अन्
क्षण एकांती.
प्रत्येक क्षण मला, लागला
मधासा.
किती लांब वाट आहे! केवढी
ही ‘वाट’ आहे!
घेऊ दे सात फेरे,
आता...थांब रे प्रवासा!
No comments:
Post a Comment